दोनगाव येथे चंद्रशेखर अत्तरदे यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी-गाठी

attarde bhet

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांची दोनगाव बुद्रुक व खुर्द गावात आज (दि.१४) दुपारी मतदार ग्रामस्थांच्या भेटी-गाठी घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी श्री. अत्तरदे व स्थानिक जि.प.सदस्या सौ.माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

 

या प्रसंगी दोनगाव बुद्रुक व खुर्द गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, तसेच भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राकेश नन्नवरे, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख समाधान पाटील, राहुल पाटील, अमर पाटील, कैलास पाटील, जगदीश पाटील, बूथ प्रमुख प्रेमचंद पाटील, हेमराज पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पेज प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Protected Content