दापोरा शिवारात गावठी हातभट्टीवर पोलीसांचा छापा; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारात दोन ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी छापा टाकून ७० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याप्रकरणी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात काहीजण बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे हा गावठी हातभट्टीची दारू तयार करतांना आढळून आला. जळत्या चुलीवर दारू तयार करण्याचे कच्चे व पक्क रसायन आढळून आले. यावेळी पोलीसांनी ११ ड्रममध्ये असलेले रसायन आणि ६० लिटर तयार गावठी दारू असा एकुण ७० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच त्याच नाल्याच्या बाजूला रविंद्र प्रकाश सोनवणे हा देखील गावठी हातभट्टीची दारू तयार करतांना पोलीसांना आढळून आला. याठिकाणी दारू तयार करण्याचे ८ ड्रममधील कच्चे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे आणि रविंद प्रकाश सोनवणे यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अशोक महाले, तुषार जोशी, संजय भालेराव यांनी ही कारवाई केली.

 

Protected Content