धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाच्या गॅरेज दुकानाचा पत्रा कापून दुकानातून ७४ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. या संदर्भात रात्री ११.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शेख अन्सार शेख अजीज (वय-३४, रा. पाळधी ता. धरणगाव) हा तरूण वास्तव्याला आहे. दरम्यान तो गॅरेज आणि वाशिंग सेंटर चालवून आपला उदरनिर्वाह करत असतो. सोमवारी ३ मार्च रात्री ८ ते मंगळवारी ४ मार्च सकाळी ९ वाजता दरम्यान त्याचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्याचे पत्राचे गॅरेजचे पत्रा कापून दुकानातून वाशिंग पंप, चार्जिंग मशीन, नोजल कुलर, कॉमन रेल इंजेक्टर यांच्यासह इतर साहित्य असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. यानंतर शेख अन्सार यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप खंडारे करीत आहे.