अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील न्यायालयाच्या आवारामध्ये एका वकिलाला किरकोळ कारणावरून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दहा ग्राम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून जीवे ठार मानाची धमकी दिल्याची घटना मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रशांत रमेश बडगुजर (वय-५२, रा. विद्यानगर अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वकिली व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते अमळनेर शहरातील न्यायालयाच्या बाहेर ओट्यावर बसलेले असताना संशयित आरोपी राजेंद्र पुरुषोत्तम पवार, मीनाक्षी कैलास भामरे आणि एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांनी किरकोळ कारणावरून प्रशांत बडगुजर यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम मोजण्याची सोन्याची चैन जबरी ओढून घेतली. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटने संदर्भात प्रशांत बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे राजेंद्र पुरुषोत्तम पवार, मीनाक्षी कैलास भामरे आणि अनोळखी व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आ. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले हे करीत आहे.