बँकेसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ येथील युनियन बँकेच्या चौकातून तरुणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकिला आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात आकाश जुगलकिशोर प्रजापती वय-२९ हा तरुण आपल्या आईवडी व पत्नी यांच्यासोबत वस्तव्याला आहे. पाणीपुरीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आकाश प्रजापती हा त्याचा मित्र बापू पाटील यांच्यासोबत जळगाव शहरातील नवीपेठ येथे दहीहंडी पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नवीपेठेतील युनियन बँकेच्या चौकात दुचाकी (एमएच 19 डीडी 8590) ही पार्किंगला लावली होती व दहीहंडी पाहण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ९ वाजून ५० मिनिटांनी कार्यक्रम पाहून ते परत दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही दिसून आली नाही. अखेर शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content