आंगणवाडी सेविकेला दोघांकडून धक्काबुक्की व दमदाटी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील मांडवे दिगर येथे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका यांना दोघांकडून धक्काबुक्की करत दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात २ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील मांडवे दिगर येथे शासकीय अंगणवाडी केंद्र आहे. या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून सुरेखा बाळू बाविस्कर या नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्या अंगणवाडीमध्ये आपले काम करत असताना गावात राहणारे पितांबर दरबार पवार आणि गणेश पुनमचंद पवार हे दोघे तेथे आले. त्यानंतर अंगणवाडी सेविकेशी वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याचा जाब विचारला असता दोघांनी अंगणवाडी सेविकाला गटारीत ढकलून दिले. त्यामुळे त्यांच्या हातापायाला दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अंगणवाडी सेविका सुरेखा बाविस्कर यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पितांबर दरबार पवार आणि गणेश पुनमचंद पवार या दोघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करत दमदटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

Protected Content