१३ वर्षीय बालकाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील पाळधी खुर्द येथील १३ वर्षीय बालकाला सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करण राजू बारेला (वय-१३) रा. पाळधी खुर्द ता.धरणगाव असे मयत बालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करण बारेला हा आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्यला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२  वाजता करण बारेला हा आपल्या काकू यांच्यासोबत पाळधी शिवारातील शेतात निंदण्यासाठी गेला होता. दुपारी ४ वाजता शेतात काम करत असताना त्याला सर्पदंश झाला, त्यामुळे त्यांतील शेतातील मजुरांनी त्याला तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजता बालाचा मृत्यू झाला होता.  या घटनेबाबत सुरुवातीला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर ही नोंद धरणगाव पोलीसात झीरो नंबरने वर्ग करण्यात आली.  त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अकस्मात अकस्मात स्मृतीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content