जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सव्हिल हॉस्पिटलसमोरून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार ७ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दानीश अहमद जावद शेख (वय-३१) रा. खडका रोड भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दानीश अहमद हा कामाच्या निमित्ताने बुधवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दुचाकी (एमएच १९ सीएम ५०२७) ने जळगाव शहरातील सव्हिल हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याने रूग्णालयाच्या गेट नंबर १ जवळ दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान काम आटोपून आल्यानंतर त्यांला त्याची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ रहिम शेख करीत आहे.