Home क्राईम निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले

निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले

0
108


जामनेर प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून रात्री तालुक्यातील देवपिंप्री येथे चाकू हल्ला झाला असून पिस्तुल रोखून धमकावण्यात आल्याच्या प्रकार घडला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, आज शुक्रवारी ग्रामपंचायींच्या निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने गुरूवारी रात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार

तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.

एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्‍यांविरूध्द जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात म्हटले आहे की, यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दीक वाद घातला तर समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

तर, तुकाराम निकम यांनी सुध्दा तक्रार दिली आहे. यानुसार त्यांचे समर्थक नितीन विकास पाटील यांच्यावर गावातच चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे नितीन सोनवणे यांनी डोक्याला मारून घेतले असून ते आमच्यावर हल्ला झाल्याचा बनाव करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound