आठवडे बाजारातून वृध्दाचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील आठवडे बाजार परिसरातून अज्ञात चोरट्यांनी वृद्धाचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारुती बळीराम ठाकरे (वय-६६) रा. मोहाडी ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. जामनेर शहरात दर गुरुवारी आठवडे बाजार असतो या निमित्ताने मारुती ठाकरे हे बाजार करण्यासाठी जामनेर शहरातील आठवडे बाजारात गुरुवारी २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आले होते. दरम्यान आठवडे बाजारात ते बाजार करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार त्यांच्या साडेसात वाजेच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु मोबाईलची माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चाटे करीत आहे.

Protected Content