रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वेस्थानकाजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी 26 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडून आला आहे. याबाबत जळगाव रेल्वेस्थानक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारात गुरुवारी २६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वर्षाच्या सुमारास एका अंदाजे २५ वर्षीय पुरुषाच्या मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयताची अज्ञात अद्याप पर्यंत कोणतीही ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी समाधान कंखरे करीत आहे.

Protected Content