रेल्वे कॉटर येथून तरूणाची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चावलखेडा रेल्वे कॉटर परिसरातील एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष राजेंद्र विसपूते वय ३२ रा. रेल्वे कॉटर चावलखेडा ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीके ६७६२) ही त्यांच्या घरसामोर पार्कींगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी गुरूवार ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर शनिवारी १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे हे करीत आहे.

Protected Content