जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मीक नगर येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून दुखापत केल्याची घटना शनिवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सोमवार ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिगंबर दिनकर सैंदाणे (वय-२५) रा.वाल्मिक नगर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नाश्त्याची गाडी लावून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दिगंबर सैंदाणे हा मासे घेण्यासाठी मच्छी विक्रेत्याकडे गेला होता. त्यावेळी एका ग्राहकाचे मच्छी विक्रेत्यासोबत भांडण सुरू होते. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले दिगंबर सैंदाणे यांना देवानंद शालिक सपकाळे वय-३२ रा. आसोदा रोड, जळगाव या तरुणाने बेदम मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी देवानंद सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.