Home क्राईम बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्यास अटक; एमआयडीसीत गुन्हा दाखल

बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्यास अटक; एमआयडीसीत गुन्हा दाखल

0
130

जळगाव प्रतिनिधी । बांधकाम ठेकेदाराच्या लोखंडी प्लेटा बांधकामच्या ठिकाणाहून एकाने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी अटक केली असून  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शेख रफिक शेख रऊफ (वय-४२) रा. नेरी ता.जि.जळगाव हे बांधकाम ठेकेदारीचे काम करतात. त्यांचे जळगाव शहरातील जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील मानराज पार्क येथे बांधकामचे काम सुरू आहे. १२ जून रोजी संध्याकाळी सर्व कामगार काम संपवून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ९४ हजार रूपये किंमतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या प्लेटा ईम्रान सादीक खाटीक (वय-३०) रा. मोहमदीया नगर याने रिक्षात टाकून चोरून नेल्याचे १३ जून रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी शेख रफिक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी इम्रान सादीक खाटीक याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound