जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर कोयत्याने वार; दोन जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल सदानंदजवळ असलेल्या परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला दोन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून हातात कोयत्याने वार करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी. याप्रकरणी दोन जणांवर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चेतन अर्जुन वाघचौरे (वय-२६) रा. वसंत चक्की चौधरीवाडा चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. चेतन वाघचौरे हे कामावरून चाळीसगाव शहरातील हॉटेल सदानंद जवळून १० ऑक्टोबर रोजी रात्री अडीच  वाजता दुचाकीने घरी जात आसतांना त्यांच्या गल्लीतील दत्तात्रय उर्फ दत्तू मुकुंदा पवार (वय-३७), भुऱ्या उर्फ राहुल नाना सोनवणे  (वय-२१) दोन्ही रा. चौधरी वाडा यांनी रस्ता अडवला. जुन्या भांडणाचे नाव काढून चेतनला बेदम मारहाण केली. आणि लोखंडी कोयत्याने वार करून हाताला जखमी केले.  जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चेतन वाघचौरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.

 

Protected Content