तरुणाने घेतला टोकाचा निर्णय; कारण गुलदस्त्यात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाने पत्राच्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. लोटन सजन शिरसाट वय-४० रा. झुरखेडा ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे लोटन शिरसाट हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांनी मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान राहत्या घराच्या शेजारी असलेल्या पत्राच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने खाली उतरवून धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील हे करीत आहे.

Protected Content