शिवाजी नगरातून महिलेची पर्स लांबविली ; 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास

388e0b7a 4417 4447 9246 22e07e587a40

जळगाव (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातून किनगाव येथे जात असताना अज्ञात चोरट्यांनी एका विवाहितेची पर्स लांबवून सोन्या-चांदीचे दागिन्यासह 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडलीय. याबाबत शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

मिळालेली माहिती अशी की, ज्योति आनंदा सोनवणे वय 38 राहणार बालाजी अपार्टमेंट हनुमान मंदिर जवळ, सिल्वासा दादर, नगर हवेली यांचे यावल तालुक्‍यातील किनगाव हे माहेर असून सुट्ट्यांच्या निमित्त वडिल हरिभाऊ काशीराम भालेराव यांच्यासह 27 मे रोजी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावरून उतरून शिवाजी नगर बसस्टॉप जवळ, अमर चौकात किनगाव जाण्यासाठी उभ्या होत्‍या. त्यावेळी त्यांच्यासोबत एका पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि तीन हजार रुपये असे एकूण 43 हजार रुपयांचा ऐवज ठेवलेला होता. जळगाव वाघझीरा या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्स ताणून नेली. पर्समध्ये 24 हजार रुपयाची 10 ग्रॅम सोन्याची चैन, 9 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅम कानातले टॉप्स, 5 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम कानातले टॉप, 2 हजार रुपयाचे एक ग्रॅमचे कानातील बाली आणि 3 हजार रुपये रोख असे एकूण 43 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या संदर्भात ज्योती सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दीपक सोनवणे करीत आहे.

Add Comment

Protected Content