शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे दुसऱ्या टप्प्यातील ७५ कोटींचे अनुदान वितरीत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या दुसऱ्या टप्प्यातील ७५ कोटींचे अनुदान वितरीत झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

 

जिल्ह्यात गेल्या वर्षी सप्टेबर ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेतपिकांचे झालेल्या नुकसानीपोटी राज्यशासन स्तरावरून मदत अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्या नुकसानीच्या पहिल्या टप्प्यात २०८ कोटीचे अनुदान मदत जिल्हा स्तरावरून वितरीत करण्यात आली होती. तर गेल्या २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्यातील ७५ कोटीहून अधिक मदतीचे अनुदान वितरीत करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

 

जिल्ह्यात  गेल्या खरीप हंगाम २०२१ दरम्यान अतिवृष्टी, पूरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे तालुका स्तरावरून तहसील, कृषी, ग्रामसेवक स्तरावरून करण्यात आले होते. या नुकसानीपोटी राज्य शासन स्तरावरून मदत जाहीर करण्यात आली. त्यनुसार पहिल्या टप्यात २०७ कोटींचे अनुदान दिवाळीनंतर डिसेंबर अखेर वितरीत करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी

 

उर्वरित मदतीपोटीच्या दुसऱ्या टप्यात

७५ कोटी, ७३ लाख ७६ हजार ८९२ रुपये अनुदान मदत वितरण तालुकास्तरावर करण्यात आले आहे. तहसील स्तरावरून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या याद्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे काम जलद गतीने केले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Protected Content