ज्ञानेश्वर मुळे यांची मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी निवड

dnyeawar mule

जळगाव प्रतिनिधी । प्रसिध्द लेखक व विचारवंत तथा परराष्ट्र खात्याचे सेवानिवृत्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी येत्या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर मुळे यांनी पासपोर्ट सहज आणि सुलभ रितीने उपलब्ध व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर केंद्र स्थापन केले व पासपोर्टबाबतची सोपी नियमावली तयार केली. त्यामुळे ज्ञानेश्वर मुळे यांना पासपोर्ट ऑफ इंडिया या नावानेही संबोधित करण्यात येते. ज्ञानेश्वर मुळे यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या मित्र परीवारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content