जिल्ह्यातील जल सिंचनाच्या चार प्रकल्पांना सुधारित मान्यता

download 6

मुंबई, विशेष प्रतिनिधी | राज्य मंत्रिमंडळाच्या आज (दि.९) झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील जल सिंचनाच्या चार प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

 

मान्यता मिळालेल्या योजनांमध्ये वरणगाव तळवेल परिसरातील सिंचन योजनेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता, वाघुर प्रकल्पास सातवी सुधारित प्रशासकीय मान्यता, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता वउर्ध्व तापी टप्पा-१ (हतनूर प्रकल्प) या प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील शेळगाव बंधार्‍यासाठी आमदार हरीभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तापी नदी पात्रावरील हा बंधारा परिसरातील हजारो शेतकर्‍यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

Protected Content