अरे बापरे…भावाचा भरचौकात गोळ्या घालून खून करण्याची धमकी देत खंडणीची मागणी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात खूनाचे सत्र सुरू असल्याचे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे. एकीकडे अवैधधंदे जोमात सुरू आहे तर दुसरीकडे जेलमधून सुटून आलेले गुन्हेगारांमध्ये पोलीसांचा धाक संपल्याचे दिसून येत असल्याचे विदगाव येथील घटनेतून समोर आले आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव येथे दोन जणांनी एकाला त्यांच्या भावाला भरचौकात गोळ्या घालून खून करण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणीची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. आमचे कुणीच काही वाकडे करून शकत नाही अशी धमकी देवून पैशांची मागणी केली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे भगवान भावलाल कोळी (वय-४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भगवान कोळी हे घरी एकटे असतांना गावात राहणारे अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे हे घरात जबरी घुसले. त्यानंतर भगवान यांनी धमकी देत म्हणाले की, तुझा भाऊ जनार्दन कोळी हा बिल्डर आहे. शिवाय तु देखील आता कपासी आणि गहु विकला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहे. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतांना आम्ही एखादवेळी त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे ठार मारू शकतो. तुला तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसात आम्हाला २ लाख रूपये दे.. नाहीतर विदगावच्या भरचौकात जनार्दन कोळीला गोळ्या घालू, आम्ही आताच दरोड्याच्या गुन्ह्यात बाहेर आलो आहे. आमचे कुणाही काहीही करू शकत नाही”. अशी धमकी देवून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा प्रकार घडल्यानंतर भगवान कोळी यांनी रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी  अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे दोन्ही रा. विदगाव ता.जि.जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वासुदेव मराठे करीत आहे.

Protected Content