दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण गंभीर जखमी; मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर तालुक्यातील मारवड ते धार रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात एका दुचाकी धारकावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बापू वेलचंद पाटील रा. वाघरे ता.पारोळा हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १८ बीबी ८८०६) मारवाड-धार रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ सीडी ४१२१) वरील चालक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता. अमळनेर यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत बापू वेलचंद पाटील हा गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील हा दुचाकी घेऊन प्रसार झाला होता. या संदर्भात जखमी बापू वेलचंद यांचा भाऊ शरद पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीधारक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता.अमळनेर यांच्या विरोधात रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.

Protected Content