ढाकेवाडी येथे ज्वेलर्स दुकान फोडले; सोन्या-चांदीचे दागिने लांबविले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ढाकेवाडी येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातून सुमारे ५ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आला आहे. चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

सविस्तर माहिती अशी की, प्रसन्न प्रदीप सराफ रा. ढाकेवाडी जळगाव हे कुटुंबियांसह तीनमजली इमारतीत राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर नंदूरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी प्रसन्न यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद केले होते. मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने सराफ दुकान फोडले. दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण अंदाजे ५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाला गोणीत भरून नेला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी ३.३२ वाजता चोरट्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. त्यानंतर दोन जणांनी आत प्रवेश केला. तर एकजण बाहेर थांबलेला होता. तिघांनी डोक्यावर टोपी, हातामोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. ३.४८ वाजता दुकानाच्या आत गेलेले दोन चोरट्यांनी गोणीत सोने चांदी भरून बाहेर आले.

प्रसन्न सराफ यांची आई आज रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बाहेर आल्या तेव्हा त्यांना दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जावून पाहिले असता दुकानात चोरी केल्याचे उघडकीला आले. एमआयडीसी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पोली कर्मचारी यांनी पाहणी केली.

Protected Content