खासदारांना शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची भारतीय जनता युवा मोर्चाचे साकडे

 

जळगाव, प्रतिनिधी । शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे खासदार उन्मेश पाटील यांना शुक्रवार २९ जानेवारी रोजी देण्यात आले.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांना कर्ज प्रकरण करतांना तारण देण्याची गरज असते. मात्र याबाबत अनेक पालकांकडे तारण देण्यासाठी स्वतःचे घर अथवा स्थावर संपत्ती ही व्यवस्था नसते. तसेच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तारण देण्याबाबत नापसंती असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी व विनातारण शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना जळगाव येथे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे , भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद चौधरी, नगरसेवक मयुर कापसे ,भा.ज.यु.मो. जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर ,महेश पाटील, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, सागर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content