गुलाबभाऊंचा विजय हीच सलीमभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल ; तौसीफ पटेल यांचे भावनिक आवाहन

edbd3056 ff86 4a6e a33b 5a92e1971541

 

धरणगाव (प्रतिनिधी) माझे वडील स्व. सलिमभाई पटेल हे नेहमीच ना. गुलाबराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. आज त्यांची उणीव नक्की जाणवतेय. परंतू सलीमभाई यांनी समाजकारणाचा जो वारसा धरणगाव निर्माण केला. त्यालाच आज पुढे नेण्याची जाण्याची जबाबदारी माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकांची आहे, असे मी समजतो. म्हणूनच गुलाबभाऊंना भरघोस मतांनी विजयी करणे,हीच सलीमभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन तौसीफ पटेल यांनी धरणगावकरांना केले आहे.

 

स्व. सलिमभाई पटेल यांचे सुपुत्र तौसीफ पटेल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. सलीमभाई पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आणि सहाकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील या त्रिमूर्तीने धरणगावच्या राजकारणात व समाजकारणात एक अमीट व चिरकाल टिकणारी अशी एक छाप पाडली आहे.

 

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आजपावेतोच्या राजकारणात व समाजकारणात नेहमीच सामान्य शिवसैनिक व प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. माझे वडील एका सामान्य शिवसैनिकापासून, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ते लोकनियुक्त नगराध्यक्षपर्यंत मजल मारण्यास म्हणूनच यशस्वी झाले. एका सामान्य मुस्लिम समाजातला माणूस नगराध्यक्ष होतो. यातूनच गुलाबभाऊंनी प्रत्येक समाजाला न्याय दिल्याचे स्पष्ट होते.

 

गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी व माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांची खंबीर साथ लाभल्यामुळे माझे वडील स्व.सलीमभाई पटेल यांनी धरणगावातील वर्षानुवर्षे जटील प्रलंबित असलेले कामे मार्गी लावण्यात स्व.सलीमभाई पटेल बहुतांशी यशस्वी झाले. मग ते नवीन नगरपालिकेचे वाटर फिल्टर प्लांट असो, दोन नवीन स्मशानभूमीचे काम, नवीन पाण्याची टाकी, गावातील संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण किंवा मुस्लिम समाज कब्रस्तानातील प्रस्तावित अंतर्गत रस्ते, भडंगपुरा मज्जित मधील प्रस्तावित पेवर ब्लॉक अशा एक ना अनेक कामात आपली अमीट छाप सोडली. त्यामुळे मी एक शिवसैनिक म्हणून व एक निष्ठावंत शिवसैनिकांचा मुलगा म्हणून तमाम नागरिकांना शिवसैनिकांना प्रत्येक समाजाला अल्पसंख्यांक समुदायाला व मित्र पक्षाला अंतकरणातून विनंती करतो की, साथ द्या न्यायाला, साथ द्या सर्वांगीण विकासाला साथ द्या…गुलाबभाऊंना भरघोस मतांनी विजयी करा. गुलाबभाऊंचा विजय हीच सलीमभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन तौसीफ पटेल यांनी केले आहे.

Protected Content