जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवर असलेल्या प्रजापतनगरातील चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी लांबविल्याची घटना आज शुक्रवारी समोर आली आहे . याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रजापत नगर गट ५०६ सहा प्लॉट नंबर ५६ गोरब मंगल कार्यालयासमोर सुनील बाबुलाल हिवरकर हे राहतात . ते मजुरी काम करतात कामासाठी त्यांच्याकडे दुचाकी एमएच १९ सी.के. १५३० दुचाकी आहे . ८ फेब्रुवारी रोजी ही हिवरकर यांनी नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकी हे घरासमोर उभी केली . दुसर्या दिवशी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उठल्यावर घरासमोर उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने दुचाकी चोरीचे खात्री झाल्यावर हिवरकर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हवालदार संजय चौधरी हे करीत आहेत.