मध्यरात्री महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. त्या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत  दरवाजा ठोठावला. महिला दरवाजा उघडून बाहेर आल्या असता मंगलसिंग याने तिचा हात पकडला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यात महिलेने त्याला ढकलले याचा राग आल्याने मंगलसिंग जाधव याने महिलेला लाथ मारून पळ काढला. यावेळी महिलेचा जेठ यांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला आता त्यांनाही ढकलून पसार झाला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content