Home क्राईम तरूणाचे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकडची चोरी

तरूणाचे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकडची चोरी

0
50


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दशरथ नगरात बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड असा एकुण ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवार १ जुलै रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आहे. याप्रकरणी बुधवार ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवनीत हिम्मत पाटील वय ४० हे आपल्या कुटुंबासह दशरथ नगरात वास्तव्याला आहे. ३० जुन रोजी ते कामानिमित्त बाहेर असतांना त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ९ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे १ जुलै रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी बुधवारी ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार परिष जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound