जिल्ह्यात पालचे तापमान अचानक घसरले

2temperature 35

रावेर, प्रतिनिधी | उत्तर भारताकडून आलेल्या थंडीच्या लाटांमुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले पाल व रावेर परीसराचे सकाळचे किमान तापमान ११ अंशच्या खाली आले असून मागील दोन दिवसांपासून प्रचंड थंडी वाढलेले आहे. तसेच हा पारा अजुन खाली पडण्याची शक्यता असून जागो-जागी शेकोट्या पेटवून नागरीक थंडी पासून बचाव करीत आहे.

जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले पाल येथे मागील दोन दिवसांपासुन वातावरणात प्रचंड बदल होत असून तापमान किमान ११ अंशपर्यंत घसरले आहे. या थंडीचा मजा घेण्यासाठी अनेक पर्यटक पाल मध्ये दाखल होत आहे. जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशातुन देखिल पर्यटक येत आहे. तर अनेक ठिकाणी भरीत-पु-यांची पार्टी रंगत आहे. रावेर शहरातील नागरीकांच्या अंगात दिवसभर गरम कपडे स्वेटर घाललेले दिसत होते. सातपुडाच्या कुशीत असलेले पाल’चे दुपारी दोनच्या सुमार किमान तापमान १४ अंश वर होते. हे तापमान सकाळी व संध्याकाळी १० ते ११ अंशावर असते. उत्तर भारतात थंडीची लाट अशीच कायम राहिल्यास येथील किमान तापमान सरासरीपेक्षा अजुन खाली येण्याची दाट शक्यता आहे.

रब्बीच्या पिकांना फायदा

वाढलेल्या थंडीमुळे रब्बीचे पिक गहु, ज्वारी, हरभ-याला याचा मोठा फायदा आहे आधीच अतीवृष्टिने प्रचंड पिकांचे नुकसान झाले असतांना रब्बीच्या पिकांमधून शेतक-याना आशा निर्माण झाली आहे.

Protected Content