विखेंच्या वक्तव्यांना गांभिर्याने घेऊ नका- थोरात

vikhe thorat

संगमनेर प्रतिनिधी । आपण काँग्रेस विचारांशी प्रामाणिक असून भविष्यातही राहणार असल्याचे सांगत राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर बाळासाहेब थोरात यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. थोरात म्हणाले की, विखे यांना पक्ष बदलण्यासाठी सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय कोणीही महत्व देत नाही. आपण संकटाच्या काळात कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचार ही कधी मनात आला नाही. उलट मागील साडे चार वर्षांत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढविला, कसे पक्षविरोधी काम केले, हे सगळया जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता ते काय बोलतील याला फार महत्व देण्याची गरज नाही.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायला भेटलो होतो की, आमचे चांगले लोक तुमच्याकडे पाठवतो आणि तस घडलंही, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

Protected Content