जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील वेगवेगळ्या तीन कंपनीच्या मालकीचे ठिंबक नळ्यांचे बंडलांचे तब्बल २ लाख ८१ हजार ४०० रूपये घेवून पसार होणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी २५ जुलै रोजी रात्री नेरी येथून अटक केली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव एमआयडीसीतील प्रभंजन ऑटोमोबाईल कंपनी, रोमीत भक्कम या कंपनीने मिळालेल्या ऑर्डर नुसार जालना येथील कंपनीत पाठविण्यासाठी एकूण २ लाख ८१ हजार ४०० रूपये किंमतीचे ठिंबक नळ्यांचे बंडल चालक पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव याला वाहन क्रमांक (एमएच १९ एस ८०९७) मध्ये टाकून रवाना केले होते. दरम्यान, पंकजने सर्व माल पोहचविला.
त्यानंतर जालना येथील व्यापाऱ्यांकडून २ लाख ८१ हजार ४०० रूपये रोख घेतले आणि जळगावात येवून गाडी एमआयडीसी परिसरात लावून पसार झाला होता. त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू पंकज हा कुठेही आढळून आला नाही. अखेर कंपनीचे मॅनेजर चिराज संजय शहा यांच्या फिर्यादीवरून दि. ५ मार्च २०२१ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जामनेर तालुक्यातील नेरी येथे असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी २५ जुलै रोजी रात्री सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी, मुकेश पाटील, छगन तायडे यांनी संशयित पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव याला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.