भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पंचशील नगरातील मच्छीमार्केट भागात हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयितावर रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. संशयित आरोपीकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे वय-२१ रा. पंचशील नगर, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ परिसरातील पंचशील नगरात असलेल्या मच्छी मार्केट परिसरात लोखंडी तलवार घेऊन संशयित आरोपी आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे हा दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता कारवाई करत संशयित आरोपी आकाश इंगळे यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश चौधरी हे करीत आहे.