सलार नगरात वकीलाच्या दुचाकीवरून चोरीला गेलेली बॅग मेहरूणमध्ये सापडली

जळगाव प्रतिनिधी । सलार नगरातील अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये दुचाकीच्या हॅण्डलवर अडकवलेली वकीलाची २ लाख ६० हजार रूपये ठेवलेल्या दोन बॅग चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दोन्ही बॅगा फातेमा मशिदीजवळ आढळून आल्यात आहेत. मात्र त्यातील रोकड लंपास केली असून  चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

अॅड. जुबेर अहमद जहांगीर खान (वय ३२) रा. सलार नगर यांची दोन बॅग चोरीस गेली आहे. अॅड. जुबेर हे आज मंगळवारी सकाळी १० वाजता नियमित कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये आल्यानंतर त्यांनी हातातील बॅग दुचाकीच्या हॅण्डलवर अडवली होती. या बॅगेत २ लाख ६० हजार रुपये रोख, तीन पेन ड्राईव्ह, बँकेचे पासबुक असे साहित्य होते. दरम्यान, अॅड. जुबेर यांना पार्कींगमध्ये उमर फारुख शेख हे भेटले. यानंतर दोघेजण अपार्टमेंटमधील एक रिकामे घर पाहण्यासाठी गेले. यावेळी अॅड. जुबेर यांनी दोन्ही बॅगा दुचाकीच्या हॅण्डवरच सोडली होती. सुमारे अर्ध्या तासाने अॅड. जुबेर व शेख पुन्हा पार्कींगमध्ये आले तेव्हा दुचाकीवर अडवकलेली बॅग कोणीतरी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

या प्रकरणी अॅड. जुबेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज दुपारी फातेमा मशिदीच्या भिंतीवर लॅपटॉपची रक्झीनच्या दोन्ही बॅगा आढळून आल्या आहेत.  त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, गणेश शिरसाळे, सचिन पाटील  यांनी जाऊन बॅगा ताब्यात घेतले. मात्र त्यातील २ लाख ६० हजार रूपयांची रोकड व दोन पेनड्राईव्ह चोरीस गेल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास पोहेकॉ मुदस्सर काझी करीत आहेत.

Protected Content