Home क्राईम तरूणाला “या” कारणासाठी बेदम मारहाण

तरूणाला “या” कारणासाठी बेदम मारहाण


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खडका गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या पुतण्याचा रस्ता आडवून दोघांना बेदम मारहाण करून दुचाकीचे नुकसान केल्याची घटना रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तुषार वासुदेव भोळे वय-३२, रा. खडका ता.भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक महिन्यापूर्वी तुषार भोळे याने प्रेमविवाह केलेला आहे. या रागातून रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तुषार भोळे दुकानावर बसलेला असताना गावात राहणारा सागर दगडू पाटील याने तुषारला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर तुषार हा पुतण्या सोबत दुचाकीने घरी जात असतांना सागर पाटील व इतरांना दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केली. या घटनेबाबत तुषार भोळे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर दगडू पाटील, पवन मंगलसिंग पाटील, योगेश सुपडूसिंग महाजन, मनिष कमलाकर धांडे, तेजबहादुरसिंग सुरेंद्रसिंग पाटील, विशाल सामसिंग पाटील, रजत नानासिंग पाटील, पृथ्वीसिंग राजेंद्रसिंग पाटील, प्रशांत रामसिंग पाटील, सुरेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, अरुणसिंग नारायणसिंग पाटील, राजेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, शारदा राजेंद्रसिंग पाटील आणि श्यामसिंग पंचमसिंग पाटील सर्व रा. खडका ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.


Protected Content

Play sound