भुसावळ (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व एम. आय. तेली इंग्लिश मेडीअम स्कूल, भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 3 मार्च, 2019 रोजी सकाळी दहा वाजेपासून एम.आय.तेली इंग्लिश मेडीअम स्कूल, रेल्वे स्टेशन जवळ, भुसावळ येथे अल्पसंख्यांक बहुलक्षेत्रात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी दिली आहे.
या मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/नापास, 12 वी पास, आय.टि.आय पास, पदवीधर अशी आहे. या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उद्योजकांना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांनी मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. नियोक्त्याकडून देण्यांत येणाऱ्या वेतनाबाबत व इतर सवलतींबाबत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत. या मेळाव्यास जिल्ह्यातील इच्छुक व पात्र बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.