तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगर मधील हनुमान मंदिर परिसरातून लोखंडी तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार आणि कार हस्तगत केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आदेश पांडुरंग सपकाळे वय-२७, रा. म्हाडा कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील हनुमान मंदिर परिसरात कारमधून आलेला तरुण हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याचे गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी बुधवार २० मार्च रोजी रात्री १२.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी आदेश सपकाळे आला अटक केली. त्याच्याकडून तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक (एमएच ०३ सीएम ९५९) जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आदेश सपकाळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content