दुचाकी व मोबाईल लांबविणाऱ्या संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाजवळून दुचाकी आणि मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी काशिनाथ चौकातून अटक केली आहे. त्याला  पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती आशी की, ईश्वर सुभाष घुगे (वय-४४ ) रा. चिंचोली ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते धार्मीक कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच १९ सीबी ४११४) ने चिंचोली येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांना चक्कर येत असल्याने त्यांनी एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाजवळ दुचाकी पार्क करून बाजूलाच झोपले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी आणि मोबाईल चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेची चौकशी करत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनिय माहितीनुसार ही दुचाकी संशयित आरोपी सोमनाथ भावगत अहिरे रा. कुसुंबा ता.जि.जळगाव याने चोरी केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसोळे, अल्ताफ पठाण, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे यांनी काशिनाथ चौकात सापळा रचून संशयित आरोपी सोमनाथ अहिरे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी आणि मोबाईल हस्तगत केला आहे.

Protected Content