शेतातून दुचाकी, मोबाईल व रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पिलखेडा शिवारातील शेतातून शेतकऱ्याची दुचाकीसह मोबाईल आणि ११ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेला. याप्रकरणी मंगळवारी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र सोमनाथ भालेराव (वय-४७) रा. पिलखेडा ता. जि. जळगाव हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिलखेडा शिवारातील शेत गट क्रमांक-६२ येथील शेतात पोल्ट्री फार्म आहे. या ठिकाणी १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेच्या दरम्यान राजेंद्र भालेराव पोल्ट्री फार्मच्या बाहेर झोपलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची (एमएच १९ बीडब्ल्यू १४६२) क्रमांक असलेली दुचाकीसह मोबाईल आणि ११ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर राजेंद्र भालेराव यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील करीत आहे.

Protected Content