पणन महासंघाच्या गोदामातून तीन लाख रूपये किंमतीच खताची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पणन महासंघाच्या गोदामातून तीन लाख रुपये किमतीचा खताचा साठा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही चोरी ३ मे ते १५ मे २०२३ दरम्यान झाली. या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या संदर्भात पणन महासंघाचे जिल्हा पणन  अधिकारी गजानन नारायण मगरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यात म्हटले आहे की, पणन महासंघाचे एमआयडीसी परिसरात चार गोदाम असून त्या पैकी गोदाम क्रमांक तीनच्या दुसऱ्या भागातून राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर (आरसीएफ) कंपनीच्या आरक्षित पद्धतीने ठेवलेल्या खताच्या साठ्यापैकी तीन लाख रुपये किमतीचा विपुला एनपीके (लिक्विड) खतसाठा अज्ञाताने चोरून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत.

Protected Content