लॉकडाऊनमध्ये आपल्या वाहनासाठी घरबसल्या मिळवा ई-पास !

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत उप-प्रादेशिक परिवहन विभागातर्फे अत्यावश्यक सेवांसाठी ई-पास दिला जात आहे. जळगावच्या आरटीओ कार्यालयातूनही हा पास मिळत असून यासाठी आपल्याला खालील लिंकवर नमूद केलेल्या स्टेप्स पार पाडाव्या लागणार आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तु वेळेत पोहोच होणे आवश्यक असते. यासाठी अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांना रस्त्यावरून मालाची ने-आण करण्यासाठी पासेस आवश्यक असतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्याही गोष्टींची अडचण उद्भवू नये. याकरिता जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या ८८९ वाहनांना मॅन्युअली पासेस देण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत या वाहनचालकांना पासेससाठी कार्यालयात यावे लागत होते. त्यामुळे कालापव्यय होऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तु पोहोचण्यासही उशीर होत होता. यामुळे वाहनचालकांना आवश्यक असणारा पास ऑनलाईन देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरबसल्या ई-पास मिळणार असल्याने या वाहनचालकांचा वेळ, पैसा व श्रम तर वाचणारच आहे. शिवाय घरबसल्या ऑनलाईन ई पास मिळाल्यामुळे त्यांना त्वरीत मागणीनुसार जेथे पाहिजे तेथे माल पोहोच करता येणार आहे.

ई पास मिळविण्यासाठी पद्धत

वाहनचालकांनी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या साईट ला भेट द्यावी. नंतर Apply for e pass या ऑप्शन्सवर जाऊन goods vehicle select करावे, नंतर RTO where to apply ठिकाणी एमएच- १९ (जळगाव) सिलेक्ट करावे. वाहन मालकाचे नाव नोंदवावे. वाहन चालकाचे (वीर्ळींशी) नाव नोंदवावे. वाहन चालकाचा वैध लायसन्स क्रमांक नोंदवावा. वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालक /मालक) व ई-मेल आय.डी., वाहन क्रमांक नोंदवावे. वाहनाचे चेसिस क्रमांकांचे शेवटचे ५ आकडे देऊन वाहनाचा प्रकार नोंदवावा. यासोबत कोणत्या प्रकारचा माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा. Vegetable /grain/groceries ) माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. जळगाव ते मुंबई आदी). ई-पास कालावधी नमूद करावा. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा (दिलेल्या तारखेमधून निवडावा).

Word verification character भरून अ‍ॅप्लिकेशन सबमिट करावे. ई-पाससाठी application reference number generate होईल. उपरोक्त अँप्लिकेशन क्रमांक नुसार परिवहन कार्यालयाने अ‍ॅप्रुव्हल केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई पास जनरेट होईल. तो पीडीएफफ स्वरूपात अर्जदाराच्या मेल आयडी वर पाठवण्यात येईल. त्याची अर्जदाराने प्रिंट काढून घ्यावी.

या संदर्भात अधिक माहितीसाठी जळगाव परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७/२२६१८१९ किंवा एारळश्र -ाह१९ारहरीींरपीलेा.ळप यावर संपर्क साधावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content