किरणा दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच चोरले साखरेचे पोते

पहूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील प्रविण लोढा नावाचे किराणा दुकानाच्या गोडावूनमधून मध्यरात्री ६ हजार रूपये किंमतीचे तीन साखरेचे कट्टे चोरून नेल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर गावात रुपेश प्रवीणचंद लोढा वय-३८ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पहुर पेठ गावांमध्ये प्रवीण लोढा नावाचे किराणा दुकान आहे. दरम्यान २० जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानात काम करणारा शेख अयनोद्दिन शेख जैनोद्दीन उर्फ कालू आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांनी दुकानाच्या मागच्या भिंतीवरून प्रवेश करत दुकानाच्या गोडावूनमधून ६ हजार रुपये किमतीचे तीन साखरेचे कट्टे चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर दुकानदार रुपेश लोढा यांनी मंगळवारी २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पहूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शेख अयनोद्दिन शेख जैनोद्दिन उर्फ कालू आणि इतर अनोळखी दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत आहे.

Protected Content