कठोरा येथे हिटरचा शॉक लागून वृद्ध महिलेचा मृत्यू

ed61c6dc 6c0c 4141 89c4 330c72fa2d57

 

जळगाव प्रतिनिधी । आंघोळीसाठी गेलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेला इलेक्ट्रिक हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील कठोरा येथे घडली.

 

याबाबत माहिती अशी की, मंगला रमेश जाखेटे (वय 68 रा. कठोरा ता. जळगाव) यांची दोन मजली इमारत आहे. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आंघोळीसाठी गेल्या. त्यावेळी अगोदरच बादलीत पाणी तापवण्यासाठी हिटर लावलेले होते. दरम्यान मंगलाबाई या बाथरूममध्ये जात असताना जाऊन बादलीवर पडल्या. यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगला जाखेटे यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आआली असून प्राथमिक तपास पोहेकाँ मगन मराठे करीत आहे.

Protected Content