नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते माणुसकीच्या भिंतीचे लोकार्पण

4bfc59fd bb6d 41c2 885d a66db8150b31

जामनेर (प्रतिनिधी)शहराच्या नगरध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते नुकतेच माणुसकीच्या भिंतीचे लोकार्पण झाले. या प्रसंगी संतोष सराफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले.

 

‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा….

अनेक जण जुने कपडे अनाथाश्रमात पोहोचवतात. पण अनाथाश्रमातील त्या अनाथांना या सगळ्या कपडय़ांची गरज असतेच असे नाही. कित्येकदा गरजेपेक्षा अधिकचा साठा किंवा गरज नसणाऱ्या वस्तूदेखील त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या पारंपरिक पद्धतीला फाटा देत जामनेर नागरपरिषद जामनेर यांनी आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. जुने कपडे, उबदार कपडे, चप्पल, भांडी, शैक्षणिक साहित्य या सगळया वस्तूंची खरी गरज अनेकांना उदरनिर्वाहासाठी दररोज मिळेल ते काम करणाऱ्यांना असते. त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सध्या जामनेर नागरपरिषद जामनेर यांनी न्यू इंग्लिश एक भिंत रंगवली.

 

या भिंतीवर त्यांनी ‘माणुसकीची भिंत’ असे नाव कोरले. ‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’ असा संदेश रंगवून लहान मुले, महिला, पुरुष असे वेगवेगळे कप्पे करून कपडे अडकवण्यासाठी लोखंडी रॅक केले आहे . नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था त्यांनी केली. विशेषत: जुने वापरातील कपडे, ब्लँकेट, स्वेटर्स, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवून, इस्त्री करून आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या माणुसकीच्या भिंतीला रखवालदार नाही. तर प्रत्येक सेवा भाव असणाऱ्या व सामाजिक आत्मभान असणाऱ्या नागरिकाने अध्र्या-एक तासाने जमेल तसे येऊन सेवा द्यावी. या भिंतीवर आलेल्या वस्तू व्यवस्थित लावणे व आलेल्यांना सेवा भावाने देणे किंवा स्वीकारणे. अर्थात येथे जमा झालेल्या वस्तू ज्यांना ज्या गरजेच्या आहेत. त्यांनी त्या घेऊन जाव्यात, असा हा उपक्रम आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा. दानदात्यांनी त्यांच्या गरजेचे नसलेले कपडे, वस्तू येथे ठेवावे आणि गरजूंनी ते न्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.

Protected Content