जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील दुरदर्शन टॉवर इमारतीमधील स्टोअर रूम फोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीच्या सामानांची चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ८ नोव्हेबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव-भुसावळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर दूरदर्शन टॉवरचे इमारत आहे. या इमारतीच्या बाजूला स्टोर रूममध्ये टॉवरसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान इमारतीच्या बाजूला असलेल्या स्टोर रूमची खिडकीत तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीच्या सामानांची चोरी केल्याचे लक्षात आले. या संदर्भात दूरदर्शन टॉवर येथील वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पंढरीनाथ जगन्नाथ चव्हाण (वय-५९,) यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक बापू कोळी करीत आहे.