मोबाईल बोलणे जीवावर बेतले !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ते चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसरबाग समोर ट्रक चालक फोनवर बोलत असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता महाराज घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजस्थान राज्यातील ट्रक क्रमांक (आर जे ११ जी ७३८०) हा ट्रक माल घेऊन यावल ते चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केशर बाग समोरून जात असताना ट्रकचालक राजू गोविंदसिंग उर्फ गब्बर भाई रा. इदलपूर ता. मनिया जि. दौलपूर राजस्थान हा फोनवरती बोलत ट्रक चालवत होता. रात्री ९ वाजता बोलता बोलता ट्रकच्या स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने भरदार ट्रक एका मोठ्या झाडाला आढळला. या अपघातात ट्रकचालक राजीव गोविंदसिंग उर्फ गब्बर भाई याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात त्याच्यासोबत असलेला क्लीनर महावीर कन्हैयालाल राजपूत (वय-२८) हा थोडक्यात बचावला आहे. या संदर्भात ट्रक चालकाविरोधात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

Protected Content