चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

1f85a3f2 60b6 4539 a573 abeb0d35b7f6

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात गुरुपौर्णिमा नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाची सुरुवात ओंकार व गुरुमंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला कार्यक्रमास उपस्थित असलेले आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.भगवान हळपे, उपशिक्षक अनिल शिंपी, संदीप कुलकर्णी, पवन लाठी यांच्या शुभहस्ते  माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.  महाविद्यालयाचे उपप्राचार्य भगवान हळपे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्त्व अतिशय सोप्या सहज भाषेत विद्यार्थ्यांना पटवून दिले. यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते इंग्रजी मॅरेथॉन परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक प्रसाद वैद्य तर फलक लेखन व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Protected Content