यावल येथील महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

b4377b75 9021 4791 bf68 446110b24d25

 

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विभागातर्फे गुरुपौर्णिमा नुकतीच साजरी करण्यात आली.

 

 

यावेळी  डॉ.एफ.एन.महाजन यांनी मार्गदर्शन केले की, चांगले विद्यार्थी ही गूरूची फार मोठी संपत्ती असते. त्यांचे यश, त्यांची प्रगती यात खूप मोठा आनंद सामावलेला असतो. गुरु हा शिष्यांचा उत्तम मार्गदर्शक असतो. तसेच शिष्यांच्या जीवनातील अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचे कार्य गुरु करीत असतो. गुरूपौर्णिमाच्या या शुभदिनी आपण सर्व मिळुन खऱ्या अर्थाने संकल्प करा की, गुरूंने जे मला शिकवले, ज्ञान दिले आहे, ते संमुर्ण आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत आत्मसात करून आचरणात आणू या. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ.सुधा खराटे यांनी देखील गुरूंचे महत्त्व सांगितले. तसेच ललिता नागपुरे व महेश आहिरे यांनी देखील विचार व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एफ.एन. महाजन होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. राजू पावरा यांनी केले तर आभार दिपाली पाटील यांनी मानले कार्यक्रमास डॉ.एस.पी.कापडे, प्रा.व्ही.बी.पाटील, प्रा.आहिरराव, प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.ए.पी.पाटील व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content