मु.जे. महाविद्यालयात श्रीमद्भगवद्गीता सीडी प्रकाशन सोहळा उत्साहात

MJ cooleger

जळगाव प्रतिनिधी । अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान, शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मु.जे. महाविद्यालयाच्या जनसंवाद व पत्रकारिता यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई.सोसायटी अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित आयोजित श्रीमद्भगवद्गीता ध्वनी फीत प्रकाशन केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्याहस्ते मुळजी जेठा महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भगवद्‌गीता हि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. असे आपल्या उद्घाटनपर भाषणात के.सी.ई. सोसायटीचे तथा अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब जी डी बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. किसन पाटील, केसीई सोसायटीचे सचिव अॅड.एस.एस.फालक, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.आर.राणे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, प्राध्यापिका रेखा मुजुमदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इशा वडोदकर यांनी तर आभार जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार यांनी केले.

सुरुवातीला प्राध्यापिका रेखा मुजुमदार यांची भगवद्गीतेवर आधारीत स्वयम् रचित कविता अमृत भरीते मोक्षदायी ही अनुजा मंजुळ आणि हर्षदा कोल्हटकर या विद्यार्थ्यांनी सादर केले. मोक्षदा एकादशी निमित्त श्रीमद् भगवद्गीतेवर आधारित १८ अध्यायाच्या सातशे श्लोकांचे एकत्रीकरण असलेले तसेच ज्योतिर्मय संस्थेच्या संचालिका प्रा. रेखा मुजुमदार यांनी स्वरबद्ध केलेल्या ध्वनिफितीचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. राणे यांनी विचार मांडले की डॉ.अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान गेल्या तीस वर्षापासून माध्यमिक शाळेत गीतापठण स्पर्धेचे आयोजन करते. साधारण दरवर्षी तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांपर्यंत गीता पठण केले जात आहे यामुळे मुलांवर अध्यात्मिक संस्कार होतात या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला जातो.भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी अण्णासाहेब यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना या माध्यमातून संस्काराचा ठेवा देत आहोत. जीवनाला मार्ग देणारा ग्रंथ असल्याने गीतेचे विचारांचे ज्ञान आत्मसात करावे हा वारसा पुढे चालू राहावा यासाठी दादांनी शिक्षण आणि अध्यात्म यांचा मेळ घालून संस्थेत अनेक बीजे रोवली आहेत.

प्रा.रेखा मुजुमदार यांनी आपल्या मनोगतात भगवद्गीता हा कॅलिडोस्कोप असल्याने जीवनात उभे राहण्यासाठी भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ आहे. गीता घरोघरी गेली पाहिजे हा ज्योतिर्मय संस्थेचा उद्दिष्ट आहे. ज्ञान कर्म आणि भक्तीचा समन्वय साधणारा ग्रंथ असल्याने सीडीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्याचा मूळ उद्देश आहे. उच्चारण,वाचन,पठण,आचरण या चार पायऱ्या आत्मसात केल्यास मानवाला आत्मउन्नती होते व जीवन जगण्याचा मार्ग सुकर होतो. दादांच्या कृपेने आज पूर्णत्वास आले हा दुग्धशर्करा योग असून याबद्दल दादांचे आणि संस्थेची आभार व्यक्त करते असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गीतापठण साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अशा भगिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात सुजाता गाजरे, सुनिता भंडारी, रेखा मुजुमदार, लता पाटील, माधव फडके, रजनी महाजन, प्रमिला कपुरे, उषा महाजन,जयश्री महाजन, नीलिमा चौधरी, उषा चौधरी, राखी देशपांडे, सुजाता देशपांडे आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Protected Content