सावत्र आजीने दोन वर्षांच्या नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले

jiya

 

मुंबई प्रतिनिधी । सावत्र आजीने सहाव्या मजल्यावरून दोन वर्षांच्या नातीला फेकल्याची धक्कादायक घटना मालाडच्या अप्पापाडा परिसरात घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा दुदैवी मृत्यु झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वांद्रे येथे वास्तव्यास असलेले इजाज उबेदुल्ला अन्सारी यांचे कुटुंब काही दिवसांपूर्वी कुरार येथे राहण्यास आले होते. या ठिकाणी रुकसाना, तिचा पती, मुलगी, नातू यांच्यासह इजाज त्याची पत्नी आणि मुलगी जिया हे एकत्र राहत होते. रुकसाना अन्सारी (वय-५०) ही जियाची सावत्र आजी असून खेळण्यावरून दोन्ही नातवंडांमध्ये सारख भांडण होत असे त्या प्रत्येकवेळी रुकसाना नातवाची बाजू घेई आणि जिया हिला मारहाण करायची. यामुळे जियाची आई काही दिवसापूर्वी माहेरीही गेली होती. याबाबतीत पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या रुकसाना हिने नंतर हत्येची कबुली दिली. शुक्रवारी रात्री जियाला खूप ताप होता. त्यामुळे जिया झोपत नसल्याने तिचे आईवडीलही पहाटे 3 वाजेपर्यंत जागे होते. औषध दिल्यानंतर थोडा ताप कमी झाला. नंतर जिया आणि तिचे आईवडील झोपले. यादरम्यान रुकसाना दोन ते तीन वेळा त्यांच्या खोलीत डोकावून गेली होती. तिघेही झोपल्याचे पाहून तिने खिडकीतून जियाला खाली फेकल्याची माहिती दिली आहे. कुरार पोलिसांनी आजी रुकसाना हिला अटक केली आहे. घटनेमुळे अप्पापाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content