राज्य सरकार ८० हजार कोटींचं कर्ज काढणार; अर्थमंत्र्यांची माहिती

नागपूर-वृत्तसेवा | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ताशेरे ओढले. त्याला सत्तारुढ पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली. शिवाय अधिवेशनासंबंधी सर्व माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे. परंतु चहापान हे निमित्त असतं, त्यानिमित्त चर्चा करुन कोणत्या विषयाला वेळ दिला पाहिजे, कोणता विषय जास्त महत्त्वाचा आहे यावर बोलणी होत असते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळेस विरोधकांसाठी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा विचार आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा यांचं मोठे नुकसान झालेलं आहे. आपण १ लाख २० हजार कोटींचं कर्ज काढू शकतो, जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे एवढं कर्ज काढता येतं. असं असलं तरी ८० हजार कोटी कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २०१३ मध्ये जीएसडीपीचं प्रमाण १६.३३ इतकं होतं. २०२३-२४मध्ये ते ३८ लाख कोटी होणार आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Protected Content